Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १८९

मनाचे श्लोक - श्लोक १८९ - [Manache Shlok - Shlok 189] मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा.

मनाचे श्लोक - श्लोक १८९ | Manache Shlok - Shlok 189

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८९, मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा

मनाचे श्लोक - श्लोक १८९


मही निर्मिली देव तो ओळखावा ।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे ।
परी संग सोडुनि सुखे रहावे ॥ १८९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


पृथिव्यादिकृद् देव आलोकनीयो
यदालोकने मुक्तिलाभोऽस्ति सद्यः ।
गुणैः संयुतो निर्गुण सेवनीयः
सुखे संस्थितिः सङ्गमुत्सृज्य कार्या ॥ १८९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, पृथ्वी ज्या देवाने निर्माण केली तो ओळखला पाहिजे. त्याची ओळख पटली तर जीव तत्काळ मोक्षदशा पावेल. पण जनाची तऱ्हा पहावी तर वेगळीच. विश्वनिर्मातादेव ओळखण्याऐवजी सृष्टीच्या पोटी जे पाषाण होतात त्यांनाच लोक देव समजतात.

देवें निर्मिली हे क्षिती ।
तिचे पोटीं पाषाण होती ।
तयासची देव म्हणती ।
विवेकहीन ॥

तोच निर्गुण देव सगुण झालेला पहावा. निर्गुणाला ओळखल्यावरही सगुणाला सोडू नये असा भावार्थ.

भजनरहित ज्ञानें मोक्ष होणार नाहीं ।
सकळ निगम त्यांचे सार शोधूनि पाहीं ।
सगुण भजन मागें रक्षिलें थोरथोरीं ।
अधम नर तयांचे ज्ञान संदेहकारी ॥

परंतु सगुणाची उपासना जरी सांगितलेली आहे, तरी ती अहंकारशून्य असावी, तरंच तिच्यापासून समाधान होणार आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची