Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८८

मनाचे श्लोक - श्लोक १८८ - [Manache Shlok - Shlok 188] देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे.

मनाचे श्लोक - श्लोक १८८ | Manache Shlok - Shlok 188

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८८, देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे

मनाचे श्लोक - श्लोक १८८


देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे ।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे ।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥ १८८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहं-पाशमुच्छिद्य विज्ञान-शस्त्रैः
विदेहस्थितिर्भक्तितः सेवनीया ।
विरक्तेर्बलात् सर्वनिन्द्यं विवर्ज्य
सुखे संस्थितिः सङ्गमुत्सृज्य कार्या ॥ १८८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, हा आपला संग ज्ञानाने सोडावा. ज्ञानशस्त्राने अहंकाराचे निर्मूलन करावे.

अहंकार नाहीसा होऊन विदेहीस्थिती प्राप्त झाली म्हणजे ‘भक्तिपंथेची जावें’. त्यालाच भक्त म्हणावे, हे तात्पर्य.

वैराग्येकरून,

जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व भावें करावे ॥

परंतु संग न धरावा तरंच सुख होईल.

देहातीत वस्तू आहे ।
तें तूं परब्रह्म पाहे ।
देहसंग हा न साहे ।
तुज विदेहासी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची