Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८७

मनाचे श्लोक - श्लोक १८७ - [Manache Shlok - Shlok 187] भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरुपी न साहे.

मनाचे श्लोक - श्लोक १८७ | Manache Shlok - Shlok 187

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८७, भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरुपी न साहे

मनाचे श्लोक - श्लोक १८७


भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे ॥
मना भासले सर्व काही पहावे ।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥ १८७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः पिण्ड-ब्रह्माण्डयोर्भूतसाम्यं
समस्तं त्विदं ब्रह्मरूपे न किंचिद् ।
मनो भाति यद्यत् न तत्तत् सदस्ति
सुखे संस्थितिः संगमुत्सृज्य कार्या ॥ १८७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, पंचभूते पिंडाचे ठिकाणी आहेत व तीच ब्रह्मांडाचेही ठिकाणी आहेत, म्हणून पिंड व ब्रह्मांड यांची ऐक्यता आहे.

जेंची पिंडी तेंची ब्रह्मांडी ।
प्रचीत नाही की रोकडी ।
पंचभूतांची तांतडी ।
दोहीकडे ॥

परंतु ती पंचभूते ब्रह्माचे ठिकाणी संभवत नाहीत.

ब्रह्मांड पिंडीचीं तत्वें ।
बहुरूपें विकारली ।
पिंड ब्रह्मांडही नाही ।
तें ब्रह्म जाणती भले ॥

पिंडब्रह्मांडनिरास ।
मग ते ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास ।
भकासरूप ॥

हे मना, हे जे पंचभूतात्मक दृश्य भासमान होत आहे ते सर्व पहावे, परंतु स्वरूपाची ओळख व्हावी अशी तुझी इच्छा असल्यास त्याचा संग सोडला पाहिजे.

संग सोडावा आपुला ।
मग पाहावें तयाला ।
अनुभवी तो या बोला ।
सुखावेल गा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची