Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १८६

मनाचे श्लोक - श्लोक १८६ - [Manache Shlok - Shlok 186] सदा सर्वदा राम सन्नीध आहे, मना सज्जना सत्य शोधुन पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक १८६ | Manache Shlok - Shlok 186

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८६, सदा सर्वदा राम सन्नीध आहे, मना सज्जना सत्य शोधुन पाहे

मनाचे श्लोक - श्लोक १८६


सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे ॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू ।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू ॥ १८६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः संनिधौ ते सदा राघवोऽस्ति
मनः सज्जन ! मार्गय त्वं हि सत्यम् ।
तवाऽखण्डितो राघवेणास्ति योगो
विनिष्कासय स्वान्तरात् तामहंताम् ॥ १८६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, हे मना, तू विचार करून पहा म्हणजे तुला असे आढळून येईल की, श्रीराम नेहमी तुझ्या जवळच आहेत, तू वेडा आहेस म्हणून श्रीराम मजला भेटावेत, असे तुला वाटत असते. पण श्रीरामाची आणि तुझी तुटीच मुळी झाली नाही, नेहमी भेटच आहे. वियोगच मुळी झालेला नाही, नेहमी योगच आहे. श्रीरामापासून आपण वेगळे आहोत असे तुला वाटते, तो देहबुद्धीचा भ्रम आहे. त्या वेगळेपणाची कल्पनाच सोडून दे.

आम्हा तुम्हा मुळीं जाली नाहीं तुटी ।
तुटीवीण भेटी इछितसा ।
इछितसा योग नसतां वियोग ।
तुम्हा आम्हा योग सर्वकाळ ॥

सर्वकाळ तुम्ही आम्ही येके स्थळीं ।
वायां मृगजळीं बुडो नये ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची