Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७८

मनाचे श्लोक - श्लोक १७८ - [Manache Shlok - Shlok 178] जया मानला देव तो पुजिताहे, परी देव शोधुनि कोणी न पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक १७८ | Manache Shlok - Shlok 178

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७८, जया मानला देव तो पुजिताहे, परी देव शोधुनि कोणी न पाहे

मनाचे श्लोक - श्लोक १७८


जया मानला देव तो पुजिताहे ।
परी देव शोधुनि कोणी न पाहे ॥
जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रियो यस्य यस्तस्य पूज्यः स देवः
परं वेत्ति नो देवदेवं तु कश्चित् ।
वसन्त्येव देवा जगत्यामनन्ता
रतिर्यत्र तद्-भक्तिरेवाऽस्ति वर्या ॥ १७८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७८ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की,

मातीचे देव धोंड्याचे देव ।
सोन्याचे देव रूप्याचे देव ।
काशाचे देव पितळेचे देव ।
तांब्याचे देव चित्रलेपे ॥

रवीच्या लाकडांचे देव पोंवळ्यांचे देव ।
बाण तांदळे नर्मदे देव ।
शालिग्राम काश्मिरी देव ।
सूर्यकांत सोमकांत ॥

तांब्रनाणीं हेमनाणीं ।
कोणी पूजिती देवार्चनी ।
चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी ।
घेऊनी येती ॥

उदंड उपासनेचे भेद ।
किती करावे विशद ।
आपलाले आवडीचा वेध ।
लागला जनीं ॥

भूमंडळीं देव नाना ।
त्यांची भीड उलंघेना ।
मुख्य देव तो कळेना ।
कांही केल्यां ॥

बहू देव ते जन्मले आणि मेले ।
असंख्यात होणार होऊनि गेले ।
जया नाश तो जाण मिथ्या म्हणावा ।
खरा देव तो आदरें वोळखावा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची