Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७५

मनाचे श्लोक - श्लोक १७५ - [Manache Shlok - Shlok 175] विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी, परी लीहिता कोण त्याचे कपाळी.

मनाचे श्लोक - श्लोक १७५ | Manache Shlok - Shlok 175

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७५, विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी, परी लीहिता कोण त्याचे कपाळी

मनाचे श्लोक - श्लोक १७५


विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥
हरू जाळितो लोक संहारकाळी ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


लिखत्येव भाव्यं विधिः सर्वभाले
परं तल्ललाटेऽस्ति को लेखकर्ता ।
हरः सर्वसंहारकोऽस्त्यन्तकाले
परं शंकरो दह्यतेऽन्ते च केन ॥ १७५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ब्रह्मदेव उत्पत्ती करतात, विष्णु पालन करतात व महेश संहार करतात. हे सर्व खरं आहे, पण ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं, विष्णूंचं पालन कोण करतं आणि महादेवांचा संहार कोण करतं? कपोळ म्हणजे कपाळ.

ब्रह्म्यानें सकळ निर्मिले ।
ब्रह्मयास कोणी निर्माण केलें ।
विष्णूनें विश्व पाळिलें ।
विष्णूस पाळिता कवणु ॥

रुद्र विश्वसंहार कर्ता ।
परी कोण रुद्रास संहारिता ।
कोण काळाचा नियंता ।
कळला पाहिजे ॥

तात्पर्य, विधीला निर्माण करणारा, विष्णूंचे पालन करणारा आणि शंकरांचा संहार करणारा निराळा कोणी देव आहे.

सकळांसी निर्मिता देव ।
देवासी निर्मिता नसे ।
सर्वांसी मूळ तो देवो ।
देवासी मूळ नाडळे ॥

ब्रह्मा विष्णु आणि हर ।
त्यांसी निर्मिता तोची थोर ।
तो वोळखावा परमेश्वर ।
नाना यत्नें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची