Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १३७

मनाचे श्लोक - श्लोक १३७ - [Manache Shlok - Shlok 137] जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले, परी जीव अज्ञान तैसेचि ठेले.

मनाचे श्लोक - श्लोक १३७ | Manache Shlok - Shlok 137

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३७, जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले, परी जीव अज्ञान तैसेचि ठेले

मनाचे श्लोक - श्लोक १३७


जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना ।
जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रबोध्येह जीवं प्रयाता हि श्रेष्ठाः
तथाप्यज्ञ एवेह जीवोऽस्ति हन्त ।
लयं यस्य नो यात्यहंकार-कर्म
न स ज्ञानधिं विन्दतेऽहंतया वै ॥ १३७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३७ - अर्थ


आजपर्यंत सर्व संत-म्हात्म्यांनी अगदी स्पष्टपणे आणि कळकळीने आपल्या सारख्या अज्ञानी जीवांना हरप्रकारे उपदेश केलेले आहेत. परंतु, त्यांनी सांगितलेला मार्ग आपण कधीही आचरलेला नसल्यामुळे, ते अज्ञान अजूनही जसेच्या तसेच आपल्या बुद्धीत ठसून राहिलेलं आहे.

याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, आपल्याला देहबुद्धी त्यागायची कधी इच्छाच होत नाही. आपण तिला उराशी घट्ट धरलेलं आहे. देहबुद्धीचं काम काय आहे? तर आपल्याला क्षणोक्षणी मोहात पाडून आपल्याकडून खोटी कर्मे करवून घेणे. खोटे कर्म म्हणजे ‘अशुद्ध’ कर्म. अशा अशुद्ध कर्मांमुळे आपल्याला त्याचं फळही भोगावंच लागतं. त्यामुळे, संतांनी ग्रंथादि द्वारा स्वरूपविज्ञानरूपी जी ठेव आपल्यासाठी ठेवली आहे, तिचं आकलन आपल्याच ‘मी’पणामुळे आपल्याला होत नाही

अक्षै ठेवा सकळांचा ।
परी पांगडा फिटेना शरीराचा ।
तेणें मार्ग ईश्वराचा ।
चुकोनि जाती ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची