Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३६

मनाचे श्लोक - श्लोक १३६ - [Manache Shlok - Shlok 136] भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत तें संत आनंत पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक १३६ | Manache Shlok - Shlok 136

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३६, भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत तें संत आनंत पाहे

मनाचे श्लोक - श्लोक १३६


भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत तें संत आनंत पाहे ॥
जया पाहतां द्वैत कांही दिसेना ।
भयो मानसीं सर्वथाही असेना ॥ १३६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा भीतियुक्तं हि ब्रह्माण्डमेतद्
अनन्तं तु तत् साधवश्चाभया वै ।
भवेद् यस्य तद्-ज्ञानतो द्वैतहानिः
भयं मानसात् सर्वथा तस्य नष्टम् ॥ १३६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३६ - अर्थ


श्रीसमर्थ येथे सांगत आहेत की, एकंदर ब्रह्मांडाकडे पाहता असे दिसून येते की, जीवाजीवांत विरोध लागलेला आहे आणि त्यामुळे सर्व जीव भीतीने व्याप्त दिसतात.

द्वैत म्हणजे ‘माझ्याहून कोणीतरी भिन्न आहे’ अशी भेदभावना ठेवणे. आणि अद्वैत म्हणजे ‘सर्व एकच आहे’ अशा समबुद्धीत स्थिर होणे. सर्व संत-महात्मे भक्तीप्रेमाचा आस्वाद घेऊन ‘अद्वैतबुद्धीत’ स्थिर झालेले असतात. त्यांना त्यांच्याहून वेगळं असं काही भासतच नाही. अशा संतांना भय हा रोग ग्रासत नाही. ज्यांच्या दृष्टीत द्वैत नाही, ते निश्चितच निर्भय झालेले असतात आणि अशांनाच खऱ्या अर्थाने ‘साधू’ म्हणता येईल. निर्भय आनंदावस्थेत ते सतत राहत असतात. जिथे द्वैत नाही, तिथे भय निश्चितच नाही!

साधु वस्तु अद्वये ।
तेथें कैंचें वाटेल भये ।
परब्रह्म तें निर्भये ।
तो चि साधु ॥

याकारणें भयातीत ।
साधु निर्भय निवांत ।
सकळास मांडेल अंत ।
साधु अनंतरुपी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची