Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३८

मनाचे श्लोक - श्लोक १३८ - [Manache Shlok - Shlok 138] भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले, जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले.

मनाचे श्लोक - श्लोक १३८ | Manache Shlok - Shlok 138

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३८, भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले, जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले

मनाचे श्लोक - श्लोक १३८


भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भ्रमात् चिद्-धनं यस्य गुप्तं बभुव
मृतिर्जन्मदारिद्र्यमाविर्बभूव ।
विलीना न यस्येह देहात्मबुद्धिः
न स ज्ञानधिं विन्दतेऽहंतया वै ॥ १३८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३८ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, जीव अहंकाराच्या भ्रमात पडल्यामुळे, आपल्या पूर्वजांनी ठेवलेली ब्रह्मज्ञानाची गुप्त ठेव त्याला सापडत नाही.

आणि त्यामुळे मोक्ष-ऐश्वर्य ज्यांच्या ठायी नांदत आहे, अशा सत्पुरुषांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा या अज्ञानी जीवाच्या मागचे जन्मरूपी दारिद्र्य सुटत नाही. पुनरपि जननं पुनरपि मरणं । अशी त्यांची गत असते.

‘देह हेच माझे खरे अविनाशी स्वरूप’ असा ग्रह ज्याने करून घेतलेला आहे, तो जोवर नाहीसा होत नाही, तोवर आत्मसाक्षात्कार होऊच शकत नाही.

देह मी वाटे ज्या नरा ।
तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिमानें येरझारा ।
भोगिल्या च भोगी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची