Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३३

मनाचे श्लोक - श्लोक १३३ - [Manache Shlok - Shlok 133] हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी, जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी.

मनाचे श्लोक - श्लोक १३३ | Manache Shlok - Shlok 133

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३३, हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी, जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी

मनाचे श्लोक - श्लोक १३३


हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी ।
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विरक्तिश्च भक्तिश्च विज्ञानयोगः
सदाऽऽत्मानुबोधो दृढो यद्-हृदिर्हि ।
सदा दर्शनं स्पर्शनं तस्य पुण्यं
तथा भाषणं नाशकं संशयस्य ॥ १३३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, जो हरिभक्त म्हणजे हरिदास आहे, तो बहुधा विरक्त नसावयाचा व जो ज्ञाता आहे, तो बहुधा भक्त नसावयाचा. तेव्हा जो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गुणांनी संपन्न आहे व ज्याची आत्मबुद्धी निश्चयात्मक झाली आहे, अशा पुरुषाच्या दर्शनाने-स्पर्शाने पुण्य लागते व त्याच्या मुखातून आलेल्या ज्ञानातून, आपल्या मनातील सगळे संशय दूर होऊन आपलीही बुद्धी निश्चयात्मक होते.

आत्मबुद्धि निश्चयाची ।
ते चि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधी चि ।
विसरों नये ॥

कोऽहं म्हणजे ‘मी कोण’ हा संशय दूर होऊन सोऽहं असे निश्चयात्मक ज्ञान होते.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची