Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ११९

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - [Manache Shlok - Shlok 109] अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला.

मनाचे श्लोक - श्लोक १०९ | Manache Shlok - Shlok 109

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०९, अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला

मनाचे श्लोक - श्लोक १०९


अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


द्विजोऽजामिलः पापकर्माऽन्तकाले
वदन् पुत्रनाम प्रपेदे विमुक्तिम् ।
अनाथस्य योऽस्त्याश्रयश्चक्रपाणिः
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ ११९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०९ - अर्थ


अजामिल नावाच्या मूळच्या सदाचारी, पण मन अनावर झाल्याने पापी बनलेल्या ब्राह्मणाला दासीपासून दहा पुत्र झाले. त्यांमध्ये सर्वांत धाकट्या मुलाचे नाव होते नारायण. त्यावर त्याचे अत्यंत प्रेम असे. आसन्नमरण अवस्थेतही ‘अरे नारायणा, अरे नारायणा’ अशाच हाका तो कळवळून मारीत. त्या हाका जरी मुलासाठी होत्या, तरी त्या नामाच्या पुण्याईमुळे तो ब्राह्मण वैकुंठाला गेला. केवळ मुलाच्या मिषाने मरणसमयी हरिनामस्मरण घडले, तरी अजामिल विष्णुपदी गेला. मग अत्यंत श्रद्धेने व शरणागत होऊन जर एखाद्याने नामस्मरण केले, तर तो उत्तम लोकी जाईल यात शंका कसली?

म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात की,

देव भक्तांचा कैवारी ।
देव पतितांसि तारी ।
देव होय साहाकारी ।
अनाथांचा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची