Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२०

मनाचे श्लोक - श्लोक १२० - [Manache Shlok - Shlok 120] विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं, धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी.

मनाचे श्लोक - श्लोक १२० | Manache Shlok - Shlok 120

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२०, विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं, धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी

मनाचे श्लोक - श्लोक १२०


विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं ।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी ।
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विधातुर्हितायाभवत् मत्स्यरूपो
दधाराचलां कूर्मरूपेण पृष्ठे ।
स्वभक्तान् हि पातुं श्रितो नीचयोनीः
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ १२० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, विधीकारणे म्हणजे ब्रह्मदेवाकरिता. प्रलयकाली ब्रह्मदेव निद्रा घेऊ लागले असता, हयग्रीव दैत्याने त्यांच्या मुखातून वेद हरण करून समुद्रात नेले. त्यावेळी भगवान श्रीविष्णूंनी मत्स्यावतार धारण करून त्या दैत्यास मारून ते वेद ब्रह्मदेवांना परत आणून दिले.

‘धरा’ म्हणजे पृथ्वी. ‘पुष्टिभागीं’ म्हणजे पाठीवर. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा मंदर पर्वत बुडू लागला, तेव्हा भगवान श्रीविष्णूंनी कासवाचे रूप धारण केले व बुडत चाललेला पर्वत आपल्या पाठीवर घेऊन वर काढला.

जनांच्या रक्षणासाठी भगवंत नीच योनी देखील धारण करतात. भूदेवीला दैत्यांनी समुद्रात ओढून नेले असता तिला वर काढण्यासाठी देवाने विराट स्वरूपी वराहाचा अवतार घेतल्याची कथा सर्वश्रूत आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची