Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११८

मनाचे श्लोक - श्लोक ११८ - [Manache Shlok - Shlok 118] गजेंदु महासंकटी वास पाहे, तयाकारणे श्रीहरी धांवताहे.

मनाचे श्लोक - श्लोक ११८ | Manache Shlok - Shlok 118

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११८, गजेंदु महासंकटी वास पाहे, तयाकारणे श्रीहरी धांवताहे

मनाचे श्लोक - श्लोक ११८


गजेंदु महासंकटी वास पाहे ।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


गजेन्द्रः सरस्युग्रनक्रेण पादे
धृतो विष्णुमेवास्मरत् खिन्नगात्रः ।
हरिस्तत्क्षणदेत्य योऽमोचयत्तं
स नोपेक्षते देवदेवः स्वभक्तम् ॥ ११८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, मदाने धुंद झालेला गजेंद्र आपल्या स्त्रियांसह सरोवरात क्रीडा करीत असता, नक्राने पाय धरून त्यास आत ओढून नेले. त्या संकटातून सुटण्याचे त्या गजराजाचे व त्याच्या स्त्रिया, बालक, आप्तेष्ट इत्यादिकांचे सारे प्रयत्न कसे थकले व अखेरीस गजेंद्राने भगवान श्रीहरींना शरण जाऊन आळवल्यावर, ते गरुडावरून आरूढ होऊन तेथे कसे आले व नक्रासह त्याला बाहेर काढून त्या नक्राचे मुख विदारण करून श्रीभगवंतांनी गजेंद्राला संकटातून कसे मुक्त केले इत्यादि श्रीमद्भागवतातील बोधप्रद कथाभाग (अष्टम स्कंध अध्याय २ ते ४) आबालवृद्धांमध्ये श्रूतच आहे.

देव अनाथांचा कैपक्षी ।
नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी ।
गजेंद्राकारणें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची