Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११४

मनाचे श्लोक - श्लोक ११४ - [Manache Shlok - Shlok 114] फुकाचे मुखी बोलतां काय वेचे, दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे.

मनाचे श्लोक - श्लोक ११४ | Manache Shlok - Shlok 114

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११४, फुकाचे मुखी बोलतां काय वेचे, दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे

मनाचे श्लोक - श्लोक ११४


फुकाचे मुखी बोलतां काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे ॥ ११४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


परायोपदेशे व्ययो नैव कश्चिद्
वृथाऽनुक्षणं वर्धते गर्ववेगः ।
क्रियामन्तरा वाक्पटुत्वं धिगेव
मनः सर्वथैवादरान्निश्चिनु त्वम् ॥ ११४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११४ - अर्थ


श्रीसमर्थ येथे म्हणतात की, तत्त्वज्ञानाविषयी नुसती बडबड करून कोणाचे काही खर्च होते काय? मना सर्व जाणीव सांडूनि राहे । हे चरण अगदी पाठ झाले व उठता बसता ते सारखे पुटपुटले तरी काय? दिवसानुदिवस, याचा गर्वच फार बळावत चाललेला दिसतो.

तात्पर्य, नुसते बोलणे व्यर्थ आहे. बोलण्याप्रमाणे तशी क्रिया देखील पाहिजे.

त्यामुळे हे मना, मी हे म्हणतो ते खरे का खोटे, याचा तूच आपल्याशी विचार करून पहा. म्हणजे तुला आढळून येईल की, तू लोकांना ज्ञानाच्या ज्या गोष्टी सांगत असतोस, त्याप्रमाणे तुझे स्वतःचेच वर्तन नसते.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची