Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११३

मनाचे श्लोक - श्लोक ११३ - [Manache Shlok - Shlok 113] जनी हीत पंडीत सांडीत गेले, अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले.

मनाचे श्लोक - श्लोक ११३ | Manache Shlok - Shlok 113

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११३, जनी हीत पंडीत सांडीत गेले, अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले

मनाचे श्लोक - श्लोक ११३


जनी हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे ॥ ११३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हितं विस्मृतं पण्डितैर्वादशौण्डैः
अहंताबलाद् राक्षसत्वं गतास्ते ।
परेशाद्विना पण्डितो नास्ति कश्चिद्
अतो हे मनस्त्वं त्यज स्वामहंताम् ॥ ११३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११३ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, असला हिताचा बोध पुष्कळांनी केला आहे खरा, पण त्याप्रमाणे कोणी आपले वर्तन ठेवते का? जो तो आपल्या विद्वत्तेत, मोठेपणात चूर! याचा परिणाम काय झाला? विद्याभ्यासाने ज्यांचा अभिमान झडला नाही ते ब्रह्मराक्षस मार होऊन बसले.

परंतु आपण आपल्या विद्वत्तेचा, मोठेपणाचा किंवा आपल्या सामर्थ्याचा गर्व तरी कशाला करावा? ईश्वरापेक्षा विद्वान व सामर्थ्यसंपन्न असा या जगात कोणीही नाही.

सारांश, हे मना, मी मोठा व माझे तेवढेच खरे, हा अभिमान सोडून देऊन रहा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची