Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ११२

मनाचे श्लोक - श्लोक ११२ - [Manache Shlok - Shlok 112] जनीं सांगतां ऐकता जन्म गेला, परी वादवेवाद तैसाचि ठेला.

मनाचे श्लोक - श्लोक ११२ | Manache Shlok - Shlok 112

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११२, जनीं सांगतां ऐकता जन्म गेला, परी वादवेवाद तैसाचि ठेला

मनाचे श्लोक - श्लोक ११२


जनीं सांगतां ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


गतं जन्म वक्तुस्तथा श्रोतुरेव
विवादः परं नैव शान्तो जनेषु ।
विवादोद्भवः संशयो दम्भकारी
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥ ११२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११२ - अर्थ


श्रीसमर्थ येथे म्हणतात की, जगाच्या आरंभापासून ते आतापर्यंत सांगणारे पुष्कळ व ऐकणारे त्याहून पुष्कळ होऊन गेले, परंतु वितंडवाद म्हणून ज्याला म्हणतात, तो अजूनही जशाचा तसा शिल्लक आहे.

ज्या वादापासून परस्परांची मने निर्मळ होण्याऐवजी संशयग्रस्त होतात, तो वाद दांभिक होय. असे का व्हावे ? बऱ्याच लोकांनी आजवर अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या असून व पुष्कळांनी त्या वाचल्या व ऐकल्या असूनही या जगात, वितंडवादाला अजून थारा का मिळाला? याचे उत्तर श्रीसमर्थ पुढच्या श्लोकात देतात.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची