Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०२

मनाचे श्लोक - श्लोक १०२ - [Manache Shlok - Shlok 102] अती लीनता सर्वभावे स्वभावें, जना सज्जनालागिं संतोषवावे.

मनाचे श्लोक - श्लोक १०२ | Manache Shlok - Shlok 102

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०२, अती लीनता सर्वभावे स्वभावें, जना सज्जनालागिं संतोषवावे

मनाचे श्लोक - श्लोक १०२


अती लीनता सर्वभावे स्वभावें ।
जना सज्जनालागिं संतोषवावे ॥
देहे कारणीं सर्व लावीत जावें ।
सगूणीं अती आदरेसी भजावें ॥ १०२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रकृत्योररीकृत्य नम्रत्वमेव
मनः सज्जनास्तेन संतोषितव्याः ।
स्वदेहं च लोकोपकार्ये नियुज्य
भजातिप्रमोदेन साकारमीशम् ॥ १०२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०२ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, मंहताचा स्वभावच असा असावा की, त्याने सर्वांशी मनोभावेकरून नम्रपणे वागून, सत्पुरुषांना संतोषवीत असावे.

संपूर्ण देह भगवत्कारणी झिजवीत जावा, नेत्रांनी सगुण मूर्तीचे दर्शन घ्यावे, नाकांनी श्रीपदावरील तुलसीचा सुगंध घ्यावा, जिव्हेने नामस्मरण करावे, कानांनी गुणानुवाद श्रवण करावे, मस्तकाने नमन करावे, हातांनी पूजन करावे, चरणांनी तीर्थयात्रा कराव्या, इत्यादि.

सर्व काळ राम मानसीं धरावा ।
वाचे उचारावा नामघोंष ॥ १ ॥
नामघोंष वाचे श्रवण कीर्तन ।
चरणी गमन देवाळया ॥ २ ॥
देवाळयां जातां सार्थक जाहालें ।
कारणीं लागलें कळीवर ॥ ३ ॥
कळीवर त्वचा जोडुनी हस्तक ।
ठेवावा मस्तक रामपाईं ॥ ४ ॥

सगुणाचेनि आधारें ।
निर्गुण पाविजे निर्धारें ॥

सगुणाची उपासना करता करता आपण निर्गुणापर्यंत पोचतो. म्हणून सगुणाची उपासना अति आदराने करावी. सर्व सृष्टी जेथे मिथ्या आहे, तेथे सगुणोपासना का करावी, अशी शंका घेऊ नये.

एवं सर्व सृष्टि मिथ्या जाण ।
जाणोनि रक्षावें सगुण ।
ऐसी हे अनुभवाची खूण ।
अनुभवी जाणती ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची