Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०३

मनाचे श्लोक - श्लोक १०३ - [Manache Shlok - Shlok 103] हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी, देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी.

मनाचे श्लोक - श्लोक १०३ | Manache Shlok - Shlok 103

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०३, हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी, देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी

मनाचे श्लोक - श्लोक १०३


हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थीं मना सांडि जीवीं करावी ॥ १०३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेः कीर्तने तद्गुणप्रीतिरस्तु
परब्रह्मबोधे त्वहंता च माऽस्तु ।
धने चान्यदीये तथाऽन्यप्रियायां
निरूढोऽभिमानः परित्याज्य एव ॥ १०३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, कीर्तन म्हणजे सगुणरूपाचे गुणानुवादन आणि निरूपण म्हणजे निर्गुणाचे विवरण.

सगुणकथा या नांव कीर्तन ।
अद्वैत म्हणिजे निरूपण ॥

सगुणाचे कीर्तन स्वतः करीत असता किंवा श्रवण करीत असता श्रीरामी रंगून जावे. तसेच, अद्वैताचे निरूपण स्वतः करीत असता किंवा श्रवण करीत असता, देहाचे भान विसरून जावे. साहजिक आहे. एकदा का चित्त श्रीरामचरणी लीन झाले म्हणजे देहाचे व परिस्थितीचे भान कोठून राहणार?

ध्यानी गुंतले मन ।
कैचें आठवेल जन ।
निशंक निर्लज्ज कीर्तन ।
करितां रंग माजे ॥

कांचनाचें ध्यान परस्त्रीचिंतन ।
जन्मासी कारण हे ची दोनी

म्हणून हे मना, त्या उभयतांचा मनापासून त्याग कर. पहिल्या दोन चरणांत सांगितल्याप्रमाणे, कीर्तनप्रसंगी मन श्रीरामकार होऊन श्रोत्यावक्त्यांना देहाचाही विसर पडावा, अशी इच्छा असेल तर द्रव्य आणि कांता यांची कल्पना सुद्धा डोळ्यांपुढे येता कामा नये. म्हणून क्त्यांनी,
मोलें कीर्तन करूं नये ।
आणि कीर्तनात, स्त्रीयांदिकांचें कौतुक ।
वर्णूं नयें कीं ॥ व,

विषइ लोक श्रवणीं येती ।
ते बायेकांकडे च पाहाती ।
चोरटे लोक चोरून जाती ।
पादरक्षा ॥

श्रोते असे नसावेत, असे श्रीसमर्थ सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची