Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ९०

मनाचे श्लोक - श्लोक ९० - [Manache Shlok - Shlok 90] न ये राम वाणी तया थोर हाणी, जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी.

मनाचे श्लोक - श्लोक ९० | Manache Shlok - Shlok 90

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९०, न ये राम वाणी तया थोर हाणी, जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी

मनाचे श्लोक - श्लोक ९०


न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा नामहीनस्य घोराऽस्ति हानिः
न यस्यादरो नाम्नि तज्जन्म तुच्छम् ।
हरेर्नाम वेदेषु शास्त्रेषु श्रेय-
स्करंवै परं ख्यापितं व्यासवाण्या ॥ ९० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९० - अर्थ


श्रीसमर्थ आपल्या सर्वांना बजावत आहेत की, ज्याच्या मुखी रामनाम येत नाही, तो आपण होऊन आपला मोठा घात करून घेत आहे.

जगामध्ये ज्याचा जन्म निरर्थक आहे, अशाच मनुष्याला नाम हे तुच्छ वाटते, किंवा नामस्मरणाचे त्यास कष्ट वाटतात. थोडक्यात, ज्याला नामस्मरण तुच्छ किंवा क्लेशदायक वाटते, अशा मनुष्यचा जन्म निरर्थकच समजावा.

काणी म्हणजे तुच्छ.

“हरिनाम हे बहु आगळे (आहे अशी) वेदशास्त्री पुराणी व्यासवाणी बोलली (आहे)” असा अन्वय करूम कोणी अर्थ करतात. परंतु वेदशास्त्रे ही काही व्यासप्रणीत नाहीत अशी शंका घेऊन “वेदशास्त्रे हरिनाम हे बहु आगळे (आहे अशी) पुराणी व्यासवाणी बोलली (आहे)” असा अन्वय दुसरे काही लावतात. यावर पहिल्यांचे म्हणणे असे की, इतके बारीक भेद करण्यासाठी समर्थांना वेळ नव्हता. व्याकरणादिकांचे नियम त्यांना बाधक होत नसत. त्यांचा जो कवित्वाचा प्रवाह चाले, तो पाहून व्याकरणाने वाटल्यास आपले नियम बदलावे, आणि म्हणून व्यासवाणी पुराणापुरतीच घ्यावी म्हणजे झाले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची