Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८३

मनाचे श्लोक - श्लोक ८३ - [Manache Shlok - Shlok 83] जेणे जाळिला काम तो राम ध्यातो, उमेसी अती आदरें गूण गातो.

मनाचे श्लोक - श्लोक ८३ | Manache Shlok - Shlok 83

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८३, जेणे जाळिला काम तो राम ध्यातो, उमेसी अती आदरें गूण गातो

मनाचे श्लोक - श्लोक ८३


जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरें गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।
परी अंतरी नामविश्वास तेथें ॥ ८३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्मरारीः सदा ध्यायतीशं हि रामं
उमासंयुतो गायति प्रेमबद्धः ।
दृढ-ज्ञान-वैराग्य-सामर्थ्य-युक्तः
सदाऽऽस्ते सुखं राम-विश्वास-पूर्णः ॥ ८३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८३ - अर्थ


ज्यांनी कामाला जाळून भस्म केले असे मदनारि भगवान शंकर श्रीरामाचे ध्यान करतात. (मग ज्यांची काममगरमिठी सुटत नाही, त्यांनी नामस्मरणाचा किती तरी छंद घेतला पाहिजे).

भगवान शंकर माता पार्वतीसह अत्यंत आदरपूर्वक श्रीरामाचे गुण गातात. अध्यात्मरामायणात उमामहेश्वरसंवादात्मक आहे हे सर्वश्रूतच आहे.

ज्या भगवान शंकरांच्या ठिकाणी श्रेष्ठ ज्ञान, वैराग्य व सामर्थ्यही आहेत, ते देखील नामस्मरणावर विश्वास ठेवून अखंड नामस्मरण करतात. मग ज्यांच्यामध्ये ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य यापैकी काहीच नाही, जे दीन, दुर्बल, लाचार, हताश, हतवीर्य आहेत, त्यांनी श्रद्धापूर्वक नामस्मरणाचा किती निदिध्यास लावून घेतला पाहिजे, असे श्रीसमर्थ कळकळीने आपल्या सर्वांना सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची