Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ८१

मनाचे श्लोक - श्लोक ८१ - [Manache Shlok - Shlok 81] मना मत्सरे नाम सांडूं नको हो, अती आदरे हा निजध्यास राहो.

मनाचे श्लोक - श्लोक ८१ | Manache Shlok - Shlok 81

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८१, मना मत्सरे नाम सांडूं नको हो, अती आदरे हा निजध्यास राहो

मनाचे श्लोक - श्लोक ८१


मना मत्सरे नाम सांडूं नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥ ८१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मत्सरात् मा त्यज श्रीशनाम
निदिध्यास एषोऽस्त्वतीवादरात् ते ।
मनो रामनामोत्तमं साधनं रे
न चैतस्य तुल्यं किमप्यस्ति लोके ॥ ८१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८१ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, हे मना, सत्पुरुषांविषयी मत्सरग्रस्त होऊन नामस्मरण सोडून देऊ नकोस.

नामस्मरणाचा छंद लागला म्हणजे, ज्या दैवताचे आपण नामस्मरण करतो, त्याचा निदिध्यास लागून त्यायोगे साधक साक्षात्कारी होतो.

सर्व साधनांमध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ साधन होय.

कांही च न करूनि प्राणी ।
राम नाम जपें वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी ।
भक्तांलागीं सांभाळी ॥

त्या नामस्मरणाची सर यज्ञ, याग, दान, तप, व्रत इत्यादि साधनांना येणार नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची