Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ८०

मनाचे श्लोक - श्लोक ८० - [Manache Shlok - Shlok 80] धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते.

मनाचे श्लोक - श्लोक ८० | Manache Shlok - Shlok 80

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८०, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते

मनाचे श्लोक - श्लोक ८०


धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः संश्रय श्रीशमीशस्य हृत्स्थं
तराद्यैव दुष्पार-संसार-वार्धिम् ।
प्रहेयस्त्वया दुर्भरः काम एषः
खरो मत्सरः सर्वथा दण्ड्य एव ॥ ८०॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८० - अर्थ


येथे ‘श्रीवर’ म्हणजे सीतापति श्रीराम. ‘हरा अंतरातें’ म्हणजे महादेवांच्या हृदयात वसलेला श्रीराम. श्रीसमर्थ येथे मनाला शिकवण देत आहेत की, महादेवांच्या अंतरात वसत असलेल्या श्रीरामाला धर, त्याला आपल्या हृदयात अखंड साठव, त्याला आपलासा कर.

श्रीरामाला अखंड स्मरून, तरून जाण्याला कठीण म्हणजे दुस्तर असलेला जो पर, म्हणजे फार मोठा प्रपंचरूपी सागर, त्याला तरून जा.

दुर्भर म्हणजे भरण्यास कठीण, कितीही भरले तरी जे भरतच नाही, असे जे पोट ते भरा, पण सारखे आपले त्या पोटाच्याच नादी लागू नका. त्यापासून सरा म्हणजे मागे हटा, अलिप्त राहून त्याला विसरा.

संसार सुखें करावा ।
परी कांही परमार्थ वाढवावा ॥

खर म्हणजे गर्दभ, तद्रूप जो मत्सर त्याला नीकरा करा, म्हणजे त्याच्याशी हट्टाने झगडून त्याचा समूळ नाश करा. या मत्सराच्या योगाने आपण सत्य ते असत्य व असत्य ते सत्य मानीत असतो. यासाठी बुद्धिभ्रंश करणारा मत्सर टाकून देऊन, साधुसंतांनी आखून दिलेल्या मार्गावर जा, असे समर्थ आपल्याला सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची