Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७९

मनाचे श्लोक - श्लोक ७९ - [Manache Shlok - Shlok 79] मना पावना भावना राघवाची, धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची.

मनाचे श्लोक - श्लोक ७९ | Manache Shlok - Shlok 79

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७९, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची

मनाचे श्लोक - श्लोक ७९


मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः पावनां भावनां राघवस्य
निधेह्यन्तरे माऽस्तु संसारचिन्ता ।
भवो भ्रामयत्येव जीवं सदैव
असद्-वस्तु-संधारणं व्यर्थमेव ॥ ७९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७९ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून मनाला कळकळीने समजावून सांगत आहेत की, हे मना, तू प्रपंचाची जी सारखी चिंता करत असतोस, ती सोडून, त्याऐवजी तुला पावन करणारी श्रीरामाची भावना कर, श्रीरामाचा तुला सतत ध्यास लागू दे.

सांडून आपली संसारवेथा ।
करीत जावी देवाची चिंता ॥

परंतु तू हे सोडून संसाराचीच जास्त चिंता करत असतोस. एक सत्य नीट समजून घे, दिसणारा हा संसार, ही नुसती एक भूल आहे, भ्रम आहे.

येक परब्रह्म संचलें ।
कदापी नाहीं विकारलें ।
त्यावेगळें भासलें ।
ते भ्रमरूप ॥

त्यामुळे, अशा भ्रमरूप, मिथ्या संसाराची भावना व्यर्थ आहे.

नसत्या वस्तूंच्या ठायीं जाण ।
मी माझें हा अभिमान ।
तें चि मोहाचें लक्षण ।
ममता दारुण ते संधी ॥

सत्यस्वरूपाचा आनंद घे, मिथ्या मायेचा आधार सोड!


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची