Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७०

मनाचे श्लोक - श्लोक ७० - [Manache Shlok - Shlok 70] सदा रामनामे वदा पुर्णकामें, कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें.

मनाचे श्लोक - श्लोक ७० | Manache Shlok - Shlok 70

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७०, सदा रामनामे वदा पुर्णकामें, कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें

मनाचे श्लोक - श्लोक ७०


सदा रामनामे वदा पुर्णकामें ।
कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः कीर्तय त्वं हरिं कामपूरं
न वै बाध्यसे दुःखजालैः कदापि ।
मदालस्यमाशु त्वया सम्प्रहेयं
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ७० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७० - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, पूर्णकामे हे ‘रामनामे’ चे विशेषण आहे. पूर्णकामे म्हणजे ज्यांच्या योगाने कामना पूर्ण होतात अशी.

ठाईं पाडी राम जीवांचा विश्राम ।
तेणें सर्व काम पूर्ण होती ॥

बाधिजेना + आपदा.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

जी साधने करावयाची, ती नित्य नियमाने करीत गेल्यास संकटांची बाधा येत नाही.

परमेश्वराची अनंत नामें ।
स्मरतां तरिजे नित्य नेमें ।
नामस्मरण करितां येमें ।
बाधिजेना ॥

मद + आलस्य = गर्व आणि आळस.

थोर आयुष्य मोलाचें ।
मदें वेर्थ चि नासिलें ॥

असा आयुष्याचा नाश करणारा गर्व न करावा. मोठेपणाची घमेंड सोडून लहानाबरोबर लहान होऊन अखंड श्रीरामनामस्मरण करावे! नित्य नियमाला दुसरे विघ्न आळसाचे, तो आळसही सर्वथा त्याजावा.

येकाग्र करूनियां मन ।
बळें चि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन ।
होऊं च नये ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची