/* Dont copy */
मनाचे श्लोक - श्लोक ५४ | Manache Shlok - Shlok 54
स्वगृहअभिव्यक्तीविचारधनसमर्थ रामदासमनाचे श्लोक

मनाचे श्लोक - श्लोक ५४

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५४, सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं, मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी

मनाचे श्लोक - श्लोक ५४ - [Manache Shlok - Shlok 54] सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं, मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी.

मनाचे श्लोक - श्लोक ६५
मनाचे श्लोक - श्लोक ६४
मनाचे श्लोक - श्लोक ६३
मनाचे श्लोक - श्लोक ८२
मनाचे श्लोक - श्लोक ६२
मनाचे श्लोक - श्लोक ५४ | Manache Shlok - Shlok 54

मनाचे श्लोक - श्लोक ५४


सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदाऽरण्यसंस्थो भवेद् यो युवाऽपि
विकल्पस्य चित्ते मलो नैव यस्य ।
दृढः प्रत्ययो यस्य चित्तान्न याति
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगतात की, श्रीरामाचा दास आपले तारुण्य सर्वकाळ अरण्याच्या सेवनात घालवतो. अरण्यात एकांत असतो आणि एकांतात चाळणा होऊन ज्ञान प्राप्त होते म्हणून अरण्यवास श्रेष्ठ.

चाळणा करावी सर्वे ।
येकांती राहातां बरें ।
येकांत मानला ज्याला ।
त्याला साधे हळुहळु ॥

संवाद वेवाद होतों ।
वेवादें युद्ध होतसे ।
म्हणोनि लोक सोडावे ।
आरण्य धरिता बरें ॥

असा श्रेष्ठ अरण्यवास वृद्धपणी कोठून होणार?

देह्याचा भर्वसा नाहीं ।
तारुण्य चळतें जनी ।
वृधापी विटंबे काया ।
रूप विद्रूप होतसे ॥

असे सांगून स्फुट प्रकरणांपैकी नव्या प्रकरणात वृद्धावस्थेच्या आपदा निवेदन करून समर्थ म्हणतात -

ऐसें हें दुःख वृधापीं ।
कळलें पाहिजे जना ।
परत्र साधणें आधीं ।
तारुणीं च उठाउठी ॥

समर्थ म्हणतात -

एवं कल्पितां कल्पेना ।

ना तर्कितां हि तर्केना ।
कदापि भावितां भावेना ।
योगेश्वर ॥

लोक संकल्प विकल्प करिती ।
ते अवघेचि निर्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ति ।
तेव्हां योगेश्वर ॥

समर्थ म्हणतात की ब्रम्हांड कोसळले असताही ज्याचे मन श्रीरामचिंतना पासून भरकटत नाही असा तो भक्त सर्वोत्तमाचा दास असून जगात सर्वाधिक धन्य आहे.

विषईं धांवे वासना ।
परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना ।
तो सत्वगुण ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची