Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४४

मनाचे श्लोक - श्लोक ४४ - [Manache Shlok - Shlok 44] मना रे जनीं मौनमुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी.

मनाचे श्लोक - श्लोक ४४ | Manache Shlok - Shlok 44

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४४, मना रे जनीं मौनमुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी

मनाचे श्लोक - श्लोक ४४


मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मूढसङ्गे तु मौनं विधेयं
कथास्वादरो राघवस्यैव कार्यः ।
न रामो गृहे यत्र संत्यज्य तत्तु
सुखार्थे सदाऽरण्यवासो विधेयः ॥ ४४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४४ - अर्थ


मुखस्तंभ राहण्याने मौन धरल्यासारखे होत नाही. खरे मौन कोणते हे श्रीसमर्थांनी अजपाजप निरूपण करताना सांगितलं आहे.

येकांती मौन्य धरून बसे ।
सावध पाहातां कैसें भासे ।
सोहं सोहं ऐसे ।
शब्द होती ॥

ते शब्द सांडून बैसला ।
तो मौनी म्हणावा भला ।
योगाभ्यासाचा गलबला ।
याकारणें ॥

समर्थ सांगतात की, मौनी होता आले नाही तरी ठीक पण वायफळ भाषण वर्ज करावे. हे मना, इतर वाग्विलास सोडून देऊन, श्रीरामाचे गुणानुवादनकीर्तन कर.

कळहो करील शब्द रे ।
अनंत तो निशब्द रे ।
तुझी अनंत कां न व्हा ।
वेवादतां अव्हासव्हा ॥

राम नाही असे धाम असेल तर ते सोडून, सुख व्हावे अशी इच्छा असल्यास, अरण्यवास पत्करावा. धाम सोडून श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांची भेट घरी कोठून होणार? भेटीची इच्छा असल्यास वनवासच पत्करला पाहिजे. समर्थांनाही अरण्यवास अत्यंत प्रिय होता तो उगीच नव्हे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची