Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४३

मनाचे श्लोक - श्लोक ४३ - [Manache Shlok - Shlok 43] मना सज्जना एक जीवीं धरावें, जनी आपुलें हीत तूवां करावें.

मनाचे श्लोक - श्लोक ४३ | Manache Shlok - Shlok 43

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४३, मना सज्जना एक जीवीं धरावें, जनी आपुलें हीत तूवां करावें

मनाचे श्लोक - श्लोक ४३


मना सज्जना एक जीवीं धरावें ।
जनी आपुलें हीत तूवां करावें ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥ ४३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः सद्वचो मे त्वया ग्राह्यमेकं
हितं कार्यमेवात्मनः सर्वथेति ।
कदाप्येह रामेतरं नैव वाच्यं
सदाऽऽत्मस्वरूपं निदिध्यासनीयम् ॥ ४३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात मनाला बजावत आहेत की, या जगात जन्माला येऊन परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. याचा कधीही विसर पडू देऊ नको. याविषयी प्रत्येक क्षणी जागृक रहा. तरच आणि तरच मनुष्य जन्माचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

कांही च न करूनि प्राणी ।
रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी ।
भक्तांलागी सांभाळी ॥

श्रीराम नामस्मरणावाचून हे मना, जिव्हेला व्यर्थ शिणवू नकोस. बोलायचेच असेल तर रामनामाचा जप कर, नाही पेक्षा,

मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी ॥

साक्षात्कार होण्यापूर्वी श्रवण-मनन, निदिध्यास ह्या एकाहून एक वरचढ पायऱ्या चढाव्या लागतात.

श्रवणापरीस मनन सार ।
मननें कळे सारासार ।
निजध्यासें साक्षात्कार ।
निसंग वस्तु ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची