Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४२

मनाचे श्लोक - श्लोक ४२ - [Manache Shlok - Shlok 42] बहुतांपरी हेंचि आतां धरावें, रघूनायका आपुलेसे करावें.

मनाचे श्लोक - श्लोक ४२ | Manache Shlok - Shlok 42

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४२, बहुतांपरी हेंचि आतां धरावें, रघूनायका आपुलेसे करावें

मनाचे श्लोक - श्लोक ४२


बहुतांपरी हेंचि आतां धरावें ।
रघूनायका आपुलेसे करावें ॥
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अलं विस्तरेण ब्रवीम्येकमेव
मनो राघवं त्वं स्वकीयं कुरुष्व ।
तदीयं व्रतं दीननाथेति श्रुत्वा
मनः सज्जन स्वस्वरूपे वस त्वम् ॥ ४२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४२ - अर्थ


श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, हे मना, आता फार काय सांगू, एकच गोष्ट सांगतो. हवं ते कर, पण श्रीरामाला प्रथम आपलासा करून घे आणि मग इतर सर्व व्याप करत बस. हे सांगण्याचेही एक कारण आहे. दीन जनांचे रक्षण करणे हा श्रीरामाचा बाणाच आहे.

देव अनाथांचा कैपक्षी ।
नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी ।
गजेंद्राकारणें ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ॥ (श्लोक २९ पहा)

श्लोक ३८ ते ४२ अशा पाच श्लोकांचे हे सवेल आहे. ३८ व्या श्लोकात श्रीरामाचे ध्यान करायला सांगितले, ३९ त चित्त एकग्र करायला सांगितले, ४० त श्रीचरणी सारखे लक्ष ठेवून कल्पनाक्षय किंवा मनोजय करण्यास सांगितले, ४१ त अव्यभिचारिणी भक्तीच्या द्वारे विचाराने मनोबोध करण्यास सांगून, या श्लोकात शेवटी समर्थ इत्यर्थ सांगत आहेत की, श्रीरामाला कसे ही करून आपलासा करून घे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची