Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४१

मनाचे श्लोक - श्लोक ४१ - [Manache Shlok - Shlok 41] बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं, शिणावे परी नातुडे हीत कांहीं.

मनाचे श्लोक - श्लोक ४१ | Manache Shlok - Shlok 41

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४१, बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं, शिणावे परी नातुडे हीत कांहीं

मनाचे श्लोक - श्लोक ४१


बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं ॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदैवाटने नो सुखंकिंचिदस्ति
श्रमो जायते नो हितं किंचिदेव ।
विवेकेन लब्ध्वा घनानन्द-बोधं
मनो राघवे संनिवासं कुरुष्व ॥ ४१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४१ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

उगें च वणवण हिंडोन ।
काय होतें ॥

हिंडण्याने हित काहीच होत नाही पण त्याचा शीणच फार येतो. पण,

नित्य नूतन हिंडावें ।
उदंड देशाटण करावें ॥

किंवा

येके ठाई बैसोन राहिला ।
तरी मग व्याप चि बुडाला ।
सावधपणें ज्याला त्याला ।
भेटि द्यावी ॥

कित्येक ठिकाणी समर्थांनी देशाटनाचे महत्त्व फार दर्शवलं आहे. फार काय, “परिभ्रमण” एक सांप्रदायाचे लक्षण ठरवलं आहे. पण त्या पर्यटनाचा हेतु वेगळा. परमेश्वरप्राप्तीसाठी हिंडायचे असेल तर मात्र तो हेतु हिंडण्याचे साध्य व्हावयाचा नाही.

येक म्हणती फिरावें ।
तीर्थाटण ॥

त्यावर

येक म्हणती हे अटाटी ।
पाणी पाषाणाची भेटी ।
चुबकुळ्या मारितां हिंपुटी ।
कासावीस व्हावें ॥

हेच खरे. परिभ्रमण हा परमेश्वरप्राप्तीचा उपाय नव्हे. प्राप्तीचा उपाय म्हटला म्हणजे बसल्या ठायी

विचारें बरें अंतरा बोधवीजे ।

विचार करून स्वतःच्या अंतःकरणाला बोध करावा. समर्थांनी त्यांच्या सर्व साहित्यांमध्ये याच विवेकी विचाराला अत्यंत महत्त्व दिलं आहे.

संसारत्याग न करितां ।
प्रपंचउपाधी न सांडितां ।
जनामध्ये सार्थकता ।
विचारें चि होये ॥

विचार पाहेल तो पुरुषु ।
विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु ।
ठाई ठाई बोलिला ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची