Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १९२

मनाचे श्लोक - श्लोक १९२ - [Manache Shlok - Shlok 192] मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे, दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे.

मनाचे श्लोक - श्लोक १९२ | Manache Shlok - Shlok 192

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९२, मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे, दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे

मनाचे श्लोक - श्लोक १९२


मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे ।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ॥
तया खुण ते हीन दृष्टांत पाहे ।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥ १९२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनःस्पर्शहीनं स्थिरं यत्स्वरूपं
अभेदेन चिन्त्यं हि सर्वोत्तमस्य ।
न दृष्टान्तयोग्यं भवेत् तस्य किंचिद्
न निःसंगता संगता तत्र सत्या ॥ १९२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १९२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, मनाला त्याचे रूप कळत नाही. त्याला रूपच नाही म्हणावे तर त्याचे रूप कधी ढळत नाही, सदादित संचले आहे. मग त्या सर्वोत्तम श्रीरामाचे ध्यान आहे तरी कोणासारखे, म्हणून दृष्टांत देऊन पहावा तर ते ‘एकमेवाद्वितीयम्’ आहे.

स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे ।
कांही येकासारिखें नव्हे ॥

त्याची खूण पटण्याकरता जो जो म्हणून दृष्टांत योजावा, तो तो त्यापुढे कमसल ठरतो. त्याला जवळचा दृष्टांत आकाशाचा देतात. परंतु,

आकाश अनुभवा येते ।
स्वरूप अनुभवापरतें ।
म्हणोनियां आकाशातें ।
साम्यता न घडे ॥

अशा त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मीपणाचा संग किंवा निःसंग ही दोन्हीही संभवत नाहीत.

ब्रह्मज्ञानी समाधानी ।
संगातीत महां मुनी ।
मीपणातीत तें ब्रह्म ।
सदोदीतची संचले ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची