Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १८०

मनाचे श्लोक - श्लोक १८० - [Manache Shlok - Shlok 180] गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी.

मनाचे श्लोक - श्लोक १८० | Manache Shlok - Shlok 180

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८०, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी

मनाचे श्लोक - श्लोक १८०


गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥
मनी कामना चेटके धातमाता ।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


गुरुत्वे स्थिताः कोटिशः सन्ति भूमौ
अनेकेषु मन्त्रेषु तन्त्रेषु शक्ताः ।
सदा कामकामाः कथा-गीत-कारा
नृणां भ्रामका नैव मोक्षप्रदास्ते ॥ १८० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १८० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, सद्गुरुवाचून तर मोक्ष नाही आणि सद्गुरु पहावयास जावे तर आपणांस सद्गुरु म्हणवणारे लक्षावधी नव्हे तर कोट्यावधी आहेत. त्यांचे उपदेशमंत्रही बहुविध आहेत व कित्येकांच्या ठिकाणी सामर्थ्यही मोठे दिसते. तेव्हा ते सगळेच सद्गुरु मानून, त्यांपैकी कोणाचा तरी अनुग्रह घ्यावा, का सद्गुरु ओळखण्याची काही लक्षणे आहेत की जेणेकरून त्यांची ओळख पटावी?

धात म्हणजे गीतप्रबंध व मात म्हणजे ग्रंथपाठांतर किंवा मुखाने गोष्टी सांगणे. आशाळभूत चेटूक करणारा परंतु गीतप्रबंधात, ग्रंथपाठांतरात किंवा गोष्टी सांगण्यात पुष्कळ चतुर, असला गुरु व्यर्थ होय. तो शिष्यास मुक्तिदायक होणे नाही.

शिष्यास न लाविती साधन ।
न करविती इंद्रियेदमन ।
ऐसे गुरु अडक्याचे तीन ।
मिळाले तरी त्यजावे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची