Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७२

मनाचे श्लोक - श्लोक १७२ - [Manache Shlok - Shlok 172] स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या.

मनाचे श्लोक - श्लोक १७२ | Manache Shlok - Shlok 172

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७२, स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या

मनाचे श्लोक - श्लोक १७२


स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥
मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली ।
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली ॥ १७२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्फुटा वैषयी कल्पना सा त्वविद्या
यया ब्रह्म विज्ञायते स सुविद्या ।
बभूव द्विधा साऽऽदिकल्पे हि माया
विवेकाद् भवत्यात्मरूपे विलीना ॥ १७२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, विषयांच्या ठिकाणी स्फुरण पावणारी कल्पना ती अविद्या, तो विकल्प, ती अशुद्ध कल्पना होय.

ब्रह्माचे ठिकाणी स्फुरण पावणारी कल्पना ती सुविद्या, तो संकल्प, ती शुद्ध कल्पना होय.

पण मूळच्या एकाच कल्पनेची ही दोन रूपे आहेत. कल्पना हा मनाचा खेळ आहे. एका रूपात मन विषयांचं चिंतन करतं व दुसऱ्यात मन ब्रह्माचं चिंतन करतं. दोन्ही ठिकाणी द्वैत आहेच. विषयी कल्पना करण्याचा मनाला छंद लागलेला असतो, यासाठी विषयांवरून मन ब्रह्मचिंतनाकडे न्यावे व अखेरीस विचार करता करता ते सस्वरूपी लीन करून सोडावे. तेव्हा मनाचे उन्मन होते.

सत्य ब्रह्माचा संकल्प ।
मिथ्या मायेचा विकल्प ।
ऐसिया द्वैताचा जल्प ।
मनचि करी ॥

जयास द्वैत भासलें ।
ते मन उन्मन जालें ।
द्वैताअद्वैताचें तुटले ।
अनुसंधान ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची