Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १६०

मनाचे श्लोक - श्लोक १६० - [Manache Shlok - Shlok 160] नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नानाविकारी.

मनाचे श्लोक - श्लोक १६० | Manache Shlok - Shlok 160

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६०, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नानाविकारी

मनाचे श्लोक - श्लोक १६०


नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नानाविकारी ॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ १६० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो माऽस्तु वादे मतिः खेदकर्त्री
द्वैते रुचिः क्रोधकर्त्री च माऽस्तु ।
अहंता मनो यावदन्ते तवास्ते
परेभ्यो न हि ज्ञानदाने त्वमर्हः ॥ १६० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

घालूं नये वाद वाउगा वेवाद ।
तेणें गुणें खेद होत आहे ॥

हे मना, द्वैत भाव धरू नकोस. कारण त्यापासूनच षड्विकारांची उत्पत्ती होत असते.

असला परकेपणा किंवा अहंकार जोपर्यंत तुझ्या ठिकाणी आहे, तोपर्यंत दुसऱ्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याच्या भरीस पडू नकोस, कारण सर्व दुःखांचे मूळ ‘अहंकारच’ आहे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची