Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १५९

मनाचे श्लोक - श्लोक १५९ - [Manache Shlok - Shlok 159] जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची.

मनाचे श्लोक - श्लोक १५९ | Manache Shlok - Shlok 159

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५९, जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची

मनाचे श्लोक - श्लोक १५९


जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥ १५९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहन्तात्मिका मक्षिका भक्षिता चेद्
रुचिर्भोजने तस्य पुंसः कुतः स्यात् ।
अहन्ता हि हृत्स्था न यावत्प्रयाति
सुजीर्णं भवेत् ज्ञानमन्नं न तावत् ॥ १५९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘मी जाणतो’ अशी अभिमानवृत्तीच ज्ञानामृतभोजनातील माशी होय. ती माशी ज्याने खालली, त्याला ज्ञानभोजन गोड कोठून लागणार?

ही वृत्ती ज्याच्या मनातून नाहीशी झाली नाही, त्याला हे ज्ञानभोजन अजिबात पचणार नाही. तात्पर्य, अहंकार नष्ट झाल्यावाचून ज्ञान होणे शक्य नाही. एकदा अंतरी देव प्रगटला की मग तेथे मीपणाला उरी नाही.

अहंकार शत्रु द्वैतासि कारण ।
होवों नेदी ज्ञान स्वरूपाचें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची