Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५८

मनाचे श्लोक - श्लोक १५८ - [Manache Shlok - Shlok 158] श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे.

मनाचे श्लोक - श्लोक १५८ | Manache Shlok - Shlok 158

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५८, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे

मनाचे श्लोक - श्लोक १५८


श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे ।
स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे ॥
स्वये शेष मौनावला स्थीर पाहे ।
मना सर्व जाणीव सांडून राहे ॥ १५८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


श्रुतिः शास्त्रषट्कं तथा धर्मशास्त्रं
सहस्राननोऽपि स्वयं शेष-नागः ।
अशक्ता हि तद्वर्णने सर्वथेमे
मनो ज्ञानदर्पं ततस्त्वं विमुञ्च ॥ १५८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की उपनिषदे, न्यायशास्त्र, मीमांसा, तर्कशास्त्र, स्मृती, वेद, वेदांत इत्यादिकांची भिन्न वचने आहेत. सर्वांची ब्रह्मनिरूपणपद्धती एकाच प्रकारची नसून, सर्वांची मती कुंठित झाली आहेत.

वेद शास्त्र श्रृती स्मृती ।
तेथें वाक्यभेद पडती ।
ते सर्व हि निवडती ।
सद्गुरुचेनि वचनें ॥

शेष वाचाळपणीं थोर जाला ।
सहस्त्रमुखें प्रस्ताविला ।
तो ही थःकीत उगा जाला ।
नाही कळला निज ठाव ॥

मना, तेथे ही तुझा पाड तो किती! यासाठी हे मना, ‘मी जाणतो’ असा अहंकार सोडून निश्चल हो.

जेथें शेषाची प्रज्ञा मंदली ।
श्रृतीस मौन्यमुद्रा पडिली ।
जाणपणें न वचे वदली ।
स्वरूपस्थिती ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची