Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १५४

मनाचे श्लोक - श्लोक १५४ - [Manache Shlok - Shlok 154] महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे, खुणे पाविजे संतसंगे विवर्णे.

मनाचे श्लोक - श्लोक १५४ | Manache Shlok - Shlok 154

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५४, महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे, खुणे पाविजे संतसंगे विवर्णे

मनाचे श्लोक - श्लोक १५४


महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महावाक्यबोधात् तथा पञ्चकानां
विवृत्या परब्रह्म-दिग्दर्शनं वै ।
द्वितीया-दिने चन्द्रसंदर्शनार्थं
यथा वृक्षशाखाङ्गुलीर्निर्दिशन्ति ॥ १५४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, सत्पुरुषांच्या मुखातून किंवा ग्रंथातून तत्वमस्यादि महावाक्ये, पंचतत्वे व त्या पंचांची पंचवीस तत्वे इत्यादिकांचे विवरण ऐकल्याने किंवा वाचल्याने परब्रह्माची खूण पटते, म्हणजे त्याचे नुसते दिग्दर्शन होते. पुढील दोन चरणात शाखाचंद्रन्यायाचा याला दृष्टांत दिला आहे.

ज्याप्रमाणे द्वितीयेचा कलामात्र चंद्र एखाद्याला दिसत नसला म्हणजे तो ज्याने पाहिला असतो तो त्यास झाडाच्या फांदीची खूण दाखवून त्या दिशेने बघावयास सांगतो व मग हा त्या फांदीच्या दिशेने पाहतो तो त्यास चंद्र दिसतो व चंद्र दिसल्यावर खुणेसाठी योजलेली फांदी तो सोडून देऊन केवळ चंद्रच पाहात राहातो. परमार्थात परब्रह्म हा चंद्र, महावाक्यादि ही फांदी, मुमुक्षु हा चंद्र पाहण्याची इच्छा करणारा, सद्गुरु हे ज्याने चंद्र आधीच पाहिला असतो तो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची