Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४५

मनाचे श्लोक - श्लोक १४५ - [Manache Shlok - Shlok 145] सदा वीषयो चिंतितां जीव जाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला.

मनाचे श्लोक - श्लोक १४५ | Manache Shlok - Shlok 145

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४५, सदा वीषयो चिंतितां जीव जाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला

मनाचे श्लोक - श्लोक १४५


सदा वीषयो चिंतितां जीव जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे ।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें ॥ १४५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा दृश्यचिन्तोद्भवं जीवजातं
अहंकारतोऽज्ञानता विज्ञतेऽस्य ।
विवेकात् सदा स्व-स्वरूपं हि सेव्यं
न हि ब्रह्ममूले जनुर्नैव मृत्युः ॥ १४५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, जीव (आपण) सदा विषयांचे चिंतन करीत राहिला आणि म्हणून अहंभाव व अज्ञान यांनी घेरला जाऊन पुन्हा-पुन्हा जन्म पावला.

त्यामुळे विवेकबुद्धीच्या साह्याने आपण सतत ‘स्वस्वरूपाचे’ चिंतन करावे. त्यायोगे आपण सहजच जन्ममरणाच्या फेऱ्यांपासून मुक्त होतो. निश्चयाचे महापुरुष या मायानदीत उफराटे पोहत जाऊन आपल्या उपासनेच्या जोरावर थेट उगम गाठतात.

येक बळाचे निवडले ।
ते पोहत चि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र झाले ।
तीर्थरूप ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची