Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १४४

मनाचे श्लोक - श्लोक १४४ - [Manache Shlok - Shlok 144] जगी पाहतां साच ते काय आहे, अती आदरे सत्य शोधुन पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक १४४ | Manache Shlok - Shlok 144

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४४, जगी पाहतां साच ते काय आहे, अती आदरे सत्य शोधुन पाहे

मनाचे श्लोक - श्लोक १४४


जगी पाहतां साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधुन पाहे ॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां मनः किं नु सत्यं यथार्थं
त्वया सादरं तत्तु संशोधनीयम् ।
तथा कुर्वता ब्रह्म-सत्तानुभूतिः
ततोऽज्ञानजन्यो भ्रमो नाशमेति ॥ १४४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, ‘साच’ म्हणजे ‘सत्य’. या जगात सत्य वस्तू कोणती आहे, याचा अत्यंत कळकळीने विचार करून पहा, म्हणजे तू जो-जो विचार करीत जाशील, तो-तो तुझ्या भ्रांतीचे पटल उडून जाऊन ‘सत्य-स्वरूपाचे’ ज्ञान तुला होईल. हे सत्य नाही, ते सत्य नाही, सृष्टी सत्य नाही, इंद्रिये सत्य नाहीत, असा असत्याचा निवाडा करता करता अखेरीस जे सत्य ‘परब्रह्म’ उरले, त्याची तुला ओळख होऊन, भ्रम, भ्रांती व अज्ञान, ही सर्व पार नाहीशी होऊन जातील.

हे ज्ञानदृष्टीने पाहावें ।
पाहोन तेथें चि राहावें ।
निजध्यासे तदृप व्हावें ।
संगत्यागें ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची