/* Dont copy */
मनाचे श्लोक - श्लोक १३० | Manache Shlok - Shlok 130
स्वगृहअभिव्यक्तीविचारधनसमर्थ रामदासमनाचे श्लोक

मनाचे श्लोक - श्लोक १३०

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३०, मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा

मनाचे श्लोक - श्लोक १३० - [Manache Shlok - Shlok 130] मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा.

मनाचे श्लोक - श्लोक १४३
मनाचे श्लोक - श्लोक १४२
मनाचे श्लोक - श्लोक १४१
मनाचे श्लोक - श्लोक १४०
मनाचे श्लोक - श्लोक १३९
मनाचे श्लोक - श्लोक १३० | Manache Shlok - Shlok 130

मनाचे श्लोक - श्लोक १३०


मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकान्तकाळी भजावा ॥ १३० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो माऽस्तु रामं विना ते विकल्पः
सदा सत्यसंकल्प एवाऽस्तु चित्ते ।
परित्यज्य जल्पं च लोके सदा त्वं
रमाकान्तमेकान्तवृत्या भजस्व ॥ १३० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३० - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की,

सत्य ब्रह्माचा संकल्प ।
मिथ्या मायेचा विकल्प ।
ऐसिया द्वैताचा जल्प ।
म चि करी ॥

ब्रह्माचा संकल्प करावा व मायेचा विकल्प त्यागावा, असे दुसऱ्या व तिसऱ्या चरणात सांगितले आहे खरे. परंतु, खरोखर मनात अल्पमात्र संकल्प नसावा, असे पहिल्या चरणात सांगितले आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प करणारे मन वृत्तिरहित झाले पाहिजे.

वृत्तिरहित जें ज्ञान ।
तें चि पूर्ण समाधान ।
जेतें तुटे अनुसंधान ।

मायाब्रह्मीचें ॥

असे ज्ञान होण्याकरिता एकांतात श्रीरामाचे भजन-पूजन करावे. ध्यान-धारणेसाठी लागणाऱ्या एकांताचे महत्त्व फार आहे. एकांतात संकोचवृत्ती किंवा दांभिकपणा नसतो व चित्त श्रीरामचरणी जडण्यास सोईचे होते.

शिष्य येकांती बैसावें ।
स्वरुपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे ।
परमार्थ हा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची