Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १२९

मनाचे श्लोक - श्लोक १२९ - [Manache Shlok - Shlok 129] गतीकारणे संगती सज्जनाची, मती पालटे सूमती दुर्जनाची.

मनाचे श्लोक - श्लोक १२९ | Manache Shlok - Shlok 129

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १२९, गतीकारणे संगती सज्जनाची, मती पालटे सूमती दुर्जनाची

मनाचे श्लोक - श्लोक १२९


गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे ॥ १२९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः सद्गति-प्राप्तये साधुसङ्गः
ततो नश्यते दुर्मतिर्दुर्जनस्य ।
रतीशो मनःक्षोभकोऽस्तीति मत्वा
विधेयः प्रयत्नो बुधैर्निर्ममत्वे ॥ १२९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १२९ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगतात की, सत्पुरुषांचा महिमा असा आहे की, त्यांच्या संगतीने सद्गती प्राप्त होते. म्हणून सद्गती प्राप्त होण्यासाठी सत्संगती धरावी. सत्संगाच्या योगाने दुर्जनांची देखील मती पालटून ते योग्य मार्गाला लागतात. रती जी नायका, तिचा पती जो मदन, तो फार चांडाळ आहे. त्याचा स्पर्शही होऊ नये अशी तुझी इच्छा असल्यास हे मना, तू निर्विकार होऊन राहा. सत्संगतीवाचून निर्विकल्प स्थिती प्राप्त व्हायची नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची