Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९७

मनाचे श्लोक - श्लोक ९७ - [Manache Shlok - Shlok 97] मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची, अहंतागुणे यातना ते फुकाची.

मनाचे श्लोक - श्लोक ९७ | Manache Shlok - Shlok 97

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९७, मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची, अहंतागुणे यातना ते फुकाची

मनाचे श्लोक - श्लोक ९७


मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यद्वाचि रामः कथं तस्य मुक्तिः
अहंतावशो यातनां याति व्यर्थम् ।
ततो देहनाशे महादुःखमेतीति
यतो ब्रूत रे रामरामेति नित्यम् ॥ ९७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९७ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, माझे घर, माझी शेती, माझा प्रपंच, अशा रीतीने माझे-माझे करण्याने व्यर्थ दुःख होते व मरणसमयी यातले काही एक उपयोगी पडायचे नाही. असा विचार करून अहोरात्र प्रपंचात गुंतलेल्या मनाला काही प्रहर तरी तेथून काढून नामस्मरणाकडे लावावे ! ज्याच्या मुखी राम नाही, त्याच्या अंतरी तरी भगवंत कोठून येणार आणि त्याला मुक्ती तरी कशी मिळणार?

कोणाचें हे घर कोणाचा संसार ।
सांडुनी जोजार जाणें लागे ॥ १ ॥

जाणें लागे अंती येकलें सेवट ।
वेर्थ खटपट सांडुनीयां ॥ २ ॥

जन्मवरी देहे संसारी गोविलें ।
नाहीं कांही केलें आत्महित ॥ ३ ॥

आत्महित गेलें संसाराचे वाढी ।
अंती कोण सोडी रामेंवीण ॥ ४ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची