Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९६

मनाचे श्लोक - श्लोक ९६ - [Manache Shlok - Shlok 96] महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं, जपे रामनामावळी नित्यकाळीं.

मनाचे श्लोक - श्लोक ९६ | Manache Shlok - Shlok 96

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९६, महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं, जपे रामनामावळी नित्यकाळीं

मनाचे श्लोक - श्लोक ९६


महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी नित्यकाळीं ॥
पिता पापरुपी तया देखवेना ।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना ॥ ९६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वभक्तोत्तमो दैत्यवंशेऽपि जातः
प्रह्लादनामाऽजपन्नाम नित्यम् ।
पिता तस्य तन्नैव सेहे दुरात्मा
जगत्यां स नैवाजपद् रामनाम ॥ ९६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९६ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात. ज्यांचा नामस्मरणावर विश्वास नाही, ते दैत्यच होत. प्रत्यक्ष दैत्य हिरण्यकशिपु याच्या पोटी जरी प्रल्हाद जन्मास आला होता तरी लहानपणापासूनच त्याचे लक्ष ईश्वरचरणी लागले होते. हिरण्यकशिपुने जेव्हा प्रल्हादाला मोठ्या प्रेमाने विचारले की, ‘बाळा, तुला शाळेत पंतोजीने काय शिकवले ?’ यावर प्रल्हादाने उत्तर दिले की,
‘श्रवणं कीर्तनं विष्णो : स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥’. झाले!

हिरण्यकशिपुच्या मनाने घेतले की शाळेतील शिस्त बिघडली. तो गुरुपुत्रांना अद्वातद्वा बोलला. प्रल्हादाची ही नैसर्गिक मति आहे, असे गुरुपुत्र म्हणत. ते हिरण्यकशिपुला अजिबात पटेना. त्याने शाळेला जास्त शिस्त लावली, तरी प्रल्हादाची भगवद्भक्ति कमी होत नाही, असे पाहून प्रल्हादाचा त्याने आतोनात छळ केला. तथापि प्रल्हाद भक्तिमार्गापासून लवमात्रसुद्धा ढळला नाही. अखेरीस बापाने मुलाला स्वतः ठार मारण्याच्या इच्छेने आणविले. ‘मूर्खा, मजवाचून दुसरा कोण जगन्नायक आहे, तो सर्वत्र आहे म्हणतोस तर या खांबात आहे काय?’ अशी हिरण्यकशिपुने गर्वोक्ति केली. ‘होय, आहे’ असाच जबाब प्रल्हादाने दिला. ‘कार्ट्या, हा मी तुला ठार करितो आणि खांबातील तुझा हरि तुझे रक्षण कसे करितो ते पाहतो’ असे त्वेषाने म्हणून हिरण्यकशिपुने खांबावर जोराने मुष्टिप्रहार करताच भगवान श्रीहरि नृसिंहरूप धारण करून त्या स्तंभाचे ठिकाणी प्रकट झाले.

भक्तकैवारी भगवान दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत, हे दाखविण्यासाठी श्रीसमर्थांनी पुढील श्लोक १२१ यात या कथेचा पुढील अन्वय आणला आहे. श्रीमत् भागवत, सप्तम स्कंध अध्याय ५ ते १० यात प्रल्हादाचा जो कथाभाग आलेला आहे, तो प्रत्येक बालाने अवश्य प्रेमाने वाचावा.

हरिभक्त येक जाहाला प्रल्हाद ।
जयाचा गोविंद कैवारी ।
कैवारी हरि राखे नानापरी ।
ऐसा भाव धरीं आलया रे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची