Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ९५

मनाचे श्लोक - श्लोक ९५ - [Manache Shlok - Shlok 96] अजामेळ पापी वदे पुत्रकामे, तया मुक्ति नारायणाचेनि नामें.

मनाचे श्लोक - श्लोक ९५ | Manache Shlok - Shlok 95

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९५, अजामेळ पापी वदे पुत्रकामे, तया मुक्ति नारायणाचेनि नामें

मनाचे श्लोक - श्लोक ९५


अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥ ९५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनोऽजामिलो दुष्कृती पुत्रनाम
गुणन्नेव नारायणेत्याप मुक्तिम् ।
शुकं कुट्टिनी राघवेत्याह्वयन्ती
पुराणप्रसिद्धां सुविख्यातिमाप ॥ ९५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की, अजामिल नावाच्या मूळच्या सदाचारी, पण मन अनावर झाल्यामुळे पापी बनलेल्या ब्राह्मणाला दासीपासून दहा पुत्र झाले; त्यात धाकट्याचे नाव नारायण होते. त्यावर त्याचे अत्यंत प्रेम असे. आसन्नमरण स्थितीत सुद्धा तो ‘अरे नारायणा, अरे नारायणा’ असेच हाक मारीत. त्या हाका जरी पुत्रासाठी होत्या, तरी त्या नामोच्चारणामुळे तो वैकुंठात गेला. केवळ पुत्राच्या मिषाने मरणसमयी हरिनामस्मरण घडले तरी अजामिल विष्णुपदी गेला, मग श्रद्धापूर्वक नामस्मरण करणारा पुरुष, उत्तम लोकी जाईल यात काय नवल आहे?


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची