Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ९४

मनाचे श्लोक - श्लोक ९४ - [Manache Shlok - Shlok 94] तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां, निवाला हरु तो मुखे नाम घेतां.

मनाचे श्लोक - श्लोक ९४ | Manache Shlok - Shlok 94

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९४, तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां, निवाला हरु तो मुखे नाम घेतां

मनाचे श्लोक - श्लोक ९४


तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां ।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां ॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां ॥ ९४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


त्रिलोकी-विदाहे क्षमो योऽस्ति रुष्टः
स ईशः शमं प्राप यत्कीर्तनेन ।
जपत्यादराद्यत् शिवा विश्वमाता
तदेवेह सर्वैर्जनैज़् कीर्तनीयम् ॥ ९४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९४ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, भगवान शंकर कोपले तर तिन्ही लोक जाळून त्यांचे भस्म करू शकतात. पण श्रीरामाच्या स्मरणामुळे ते शांत असतात. विश्वमाता पार्वतीदेवी सुद्धा अत्यंत आदराने श्रीरामाचे स्मरण करतात. म्हणूनच आपणही श्रीरामाचे अखंड स्मरणात लीन व्हावे.

सुरेंद्र चंद्रशेखरु ।
अखंड ध्यातसे हरु ।
जनासि सांगतो खुणा ।
श्री राम राम हें म्हणा ॥

महेश पार्वतीप्रती ।
विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुणा ।
श्री राम राम हें म्हणा ॥

विषें बहुत जाळिलें ।
विशेष आंग पोळिलें ।
प्रचीत माझिया मना ।
श्री राम राम हें म्हणा ॥

बहुत प्रेत्न पाहिले ।
परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा ।
श्री राम राम हें म्हणा ॥

बहुत प्रेत्न पाहिले ।
परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा ।
श्री राम राम हें म्हणा ॥

बहुत पाहिले खरें ।
परंतु दोनि आक्षरें ।
चुकेल येमयातना ।
श्री राम राम हे म्हणा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची