Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ९२

मनाचे श्लोक - श्लोक ९२ - [Manache Shlok - Shlok 92] अती आदरें सर्वही नामघोषे, गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें.

मनाचे श्लोक - श्लोक ९२ | Manache Shlok - Shlok 92

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९२, अती आदरें सर्वही नामघोषे, गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें

मनाचे श्लोक - श्लोक ९२


अती आदरें सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषें ।
विशेषें हरामानसीं रामपीसें ॥ ९२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ससत्कारमुद्घोषिते रामनामे
सुदूरं स्वहृत्स्थाश्च दोषाः प्रयान्ति ।
हरिस्तिष्ठति प्रीत आकर्ण्य कीर्तिं
अतः श्रीशिवो रामनामैकतन्द्रः ॥ ९२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ९२ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून नामसाधनेचे महत्त्व पटवून देताना सांगतात की, श्रीरघुवीराचा अती आदराने घोष केल्यास, घोष करणाऱ्यापासून सर्व दोष पळून गिरिकंदरी लपण्यास जातात. थोडक्यात, सर्व दोषच नाहीसे होतात.

नाम स्मरे निरंतर ।
तें जाणावें पुण्य शरीर ।
माहा दोषांचे गिरिवर ।
रामनामें नासती ॥

“नामतोषें तोशला हरी तिष्ठतु” असा अन्वय. नामस्मरणाच्या आनंदाने आनंदित झालेला असा परमेश्वर तिष्ठतु म्हणजे रहातो, जेथे नामस्मरण होत असेल तेथे आनंदाने रहातो, असा अर्थ.

नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥

नाहीं वैकुंठीचा ठाईं ।
नाहीं योगियांचा हृदई ।
माझे भक्त गाती ठाई ठाई ।
तेथें मी तिष्ठतु नारदा ॥

भगवान शंकरांच्याही अंतःकरणाला रामनामस्मरणाचे वेड आहे, असं समर्थ येथे सांगत आहेत.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची