Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ११०

मनाचे श्लोक - श्लोक ११० - [Manache Shlok - Shlok 110] तुटे वाद संवाद त्याते म्हणावें, विवेके अहंभाव यातें जिणावें.

मनाचे श्लोक - श्लोक ११० | Manache Shlok - Shlok 110

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ११०, तुटे वाद संवाद त्याते म्हणावें, विवेके अहंभाव यातें जिणावें

मनाचे श्लोक - श्लोक ११०


तुटे वाद संवाद त्याते म्हणावें ।
विवेके अहंभाव यातें जिणावें ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


असद्वादहा यः स संवाद एव
विवेकेन जेतव्य एवाभिमानः ।
अहंता हि वादे विकारान् करोति
यतो वादहानिः स संवाद इष्टः ॥ ११० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११० - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, संवाद म्हणजे खरा वाद. ज्यापासून वादाचा उलगडा होतो तोच खरा वाद, त्यालाच संवाद म्हणावे.

उभयपक्षी पक्षाभिमान आहे तोवर असला संवाद होणे शक्य नाही, यासाठी भल्यांनी विचार करून अहंकाराला जिंकले पाहिजे. ज्याच्या अंतरीचा अभिमान अजून गळालेला नाही, त्याने वाद करण्याच्या भरीस पडू नये.

अभिमानाला पेटून केलेला वाद क्रोध, मद, मत्सर इत्यादि अनेक विकार उत्पन्न करतो. तात्पर्य, मनुष्याच्या अंतःकरणांत अहंकाराने जे ठाणें दिलेले असते, ते तेथून उठवून त्या ठिकाणी प्रेमाची स्थापना केल्यावाचून हितकारी वाद होणे शक्य नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची