Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०७

मनाचे श्लोक - श्लोक १०७ - [Manache Shlok - Shlok 107] मना कोपआरोपणा ते नसावी, मना बुद्धि हे साधुसंगी वसावी.

मनाचे श्लोक - श्लोक १०७ | Manache Shlok - Shlok 107

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०७, मना कोपआरोपणा ते नसावी, मना बुद्धि हे साधुसंगी वसावी

मनाचे श्लोक - श्लोक १०७


मना कोपआरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो नैव कार्यः प्रकोपः कदाचित्
मनः साधुसङ्गे प्रवृत्तिं कुरुष्व ।
मनो मुञ्च सङ्गं सदा दुर्जनानां
मनस्तेन ते मोक्षलाभोऽस्ति सत्यम् ॥ १०७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०७ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना समजावत आहेत की, कोपाची धारणा नसावी. म्हणजे कोपाला उद्भवू देऊ नये.

संतापाचा उद्भव न होण्याला एक उपाय आहे. हे मना, सत्संगतीपासून बुद्धीला ढळू देऊ नकोस. कारण,

दुर्जनसंगती सज्जन ढांसळे ।
क्रोध हा प्रबळे अकस्मात ॥

ज्या संगतीमुळे साधक, कृतनिश्चयापासून ढळतो, ती संगत दुष्टच होय. असा चांडाळ संग सोडून, हे मना, संतसज्जनांचा संग धर. तेणेकरून तू मोक्षाचा वाटेकरी होशील.

दुर्जनाचा संग होये मना भंग ।
सज्जनाचा योग सुखकारी ॥
सुखकारी संग संतसज्जनाचा ।
संताप मनाचा दुरी ठाके ॥
चांडाळसंगती होईज चांडाळ ।
होये पुण्यसीळ साधुसंगे ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची