Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १०५

मनाचे श्लोक - श्लोक १०५ - [Manache Shlok - Shlok 105] विवेके क्रिया आपुली पालटावी, अती आदरे शुद्ध क्रीया धरावी.

मनाचे श्लोक - श्लोक १०५ | Manache Shlok - Shlok 105

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०५, विवेके क्रिया आपुली पालटावी, अती आदरे शुद्ध क्रीया धरावी

मनाचे श्लोक - श्लोक १०५


विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडिं संसारतापा ॥ १०५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विवेकादशुद्धां क्रियां स्वां विहाय
विशुद्धां क्रियामादरेणाऽऽचर त्वम् ।
यथा भाषसे तद्वदेवाचर त्वं
मनः कल्पनां मुञ्च संसारदात्रीम् ॥ १०५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १०५ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, वर्णाश्रमधर्माप्रमाणे आपली क्रिया होत नसेल तर वर्णाश्रमधर्माचा विचार करून आपण धर्मबाह्य क्रियेचा त्याग करून, शुद्ध क्रियेचा मनोभावे अवलंब केला पाहिजे.

शुद्ध क्रिया म्हणजे वर्णाश्रमधर्मयुक्त अशी क्रिया. ज्या क्रियेत बोलण्याचा आणि चालण्याचा मेळ असतो, ती शुद्ध क्रिया होय असे कोणी म्हणतात. हा ही अर्थ वावगा नाही, कारण वर्णाश्रमधर्माला सोडून कोणी बोलूच शकत नाही, किंबहुना हाच अर्थ येथे अभिप्रेत दिसतो. कारण पुढे तिसऱ्या चरणात, ‘जसे बोलतोस, तसे चाल’ असे श्रीसद्गुरु सांगत आहेत. अर्थात, बोलण्याप्रमाणे जी क्रिया, तीच दुसऱ्या चरणातील शुद्ध क्रिया.

बोला ऐसें वर्तो जाणे ।
उत्तम क्रिया ॥

हे मना, कल्पनोत्पन्न संसारताप सोड. संसार ही एक कल्पनाच आहे, तेव्हा त्या संसारापासून सुख-दुःख होते, ही सुद्धा नुसती कल्पनाच होय. हे मना, तुला जर बोलण्याप्रमाणे चालायचे असेल, तर संसारापासून सुख-दुःख होते अशी जी कल्पना तू करीत असतोस, ती सोडली पहिजेस. नाहीतर तू जे म्हणतोस की ‘संसार मिथ्या आहे’, अशा नुसत्या म्हणण्याला काहीही अर्थ राहणार नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची