Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ७७

मनाचे श्लोक - श्लोक ७७ - [Manache Shlok - Shlok 77] करी काम निष्काम या राघवाचे, करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे.

मनाचे श्लोक - श्लोक ७७ | Manache Shlok - Shlok 77

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७७, करी काम निष्काम या राघवाचे, करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे

मनाचे श्लोक - श्लोक ७७


करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥
करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥ ७७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेर्नाम संकीर्तने श्रद्दधानो
भवेद् द्वन्द्वशून्योजपन् रामनाम ।
हरेः कर्म कुर्वन् भविष्यत्यकामो
स्वरूपं च सर्वत्र पश्येत् तदानीम् ॥ ७७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात, एका श्रीरामाची इच्छा केली, श्रीरामचरणांचा मनाने सारखा ध्यास घेतला की भक्त निष्काम होतो, त्याच्या सर्व इच्छा नाहीशा होतात किंवा सर्व इच्छा पूर्ण होऊन तो निष्काम होतो.

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ।

आणि कामाची तंगडी मोडली म्हणजे मग कामापासून होणारे सर्वच अनर्थ आपोआप टळतात. राघवाचे ध्यान हृदयामध्ये एकदा ठसावले म्हणजे भक्ताला सर्वत्र राम भरलेला दिसतो, त्याची दृष्टी जिथे जाईल, तिथे त्याला फक्त रामच दिसतो.

पहा पहा या जगांत राम आहे रे ।
राम आहे राम आहे राम आहे रे ॥

याचा त्याला अनुभव येतो, रिता ठाव या राघवेवीण नाहीं । हे त्याच्या प्रत्ययास येते,

माझा राम अवघाचि आपण ।
दुसरें नाही त्याची च आण ॥

असे तो प्रतिज्ञापूर्वक म्हणू लागतो. राघवाचे गुण गात गात हरिकीर्तनाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होऊन श्रीरामाच्या गुणानुवादाचा भक्ताला जो छंद लागतो तेणे करून भक्त निर्वैर होतो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची