Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ७६

मनाचे श्लोक - श्लोक ७६ - [Manache Shlok - Shlok 76] नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं.

मनाचे श्लोक - श्लोक ७६ | Manache Shlok - Shlok 76

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७६, नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं

मनाचे श्लोक - श्लोक ७६


नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


भवेन्नैव योगो न धर्मो न कर्म
न भोगो न च त्याग एकोऽपि साङ्गः ।
मनो नाम-संकीर्तने श्रद्दधस्व
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ७६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७६ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सत्य सांगत आहेत की, कर्म, धर्म, योग, भोग, त्याग काहीच यथाविधि घडत नाही आणि तशात नामस्मरणाचे ठिकाणी ही विश्वास नसेल तर मग त्या पापाला पारावार नाही. या कलियुगात कर्म, धर्म, योग इत्यादि यथासांग घडणे दुर्घट आहे, तेव्हा विश्वासयुक्त अंतःकरणाने नामस्मरण करून तरून जावे. श्रेष्ठही तेच सांगतात,

कलौ कर्मधर्मादि सकळ ।
परमेश्वरस्मरणेविण विकळ ।
जीविका चि अधर्माचें मूळ ।
तद्रूप सर्व हि आचार ॥

यासाठी सकळ हि तपें तेणें केलीं ।
सांग विधिपूर्वक त्यासी च फळलीं ।
ज्याचे वाचें विश्वासें आलीं ।
नामें हरिहराचीं ॥

तेणें केले सर्व हि त्याग ।
तेणें केले महा योग ।
तेणें केला सर्वस्वाचा त्याग ।
हरिहरनामें स्मरे जो ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची